एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. त्यातही मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का? असा प्रश्न उपस्थित करत, काही जण म्हणतात की अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. परंतु, निधी काही एकदम दिला जात नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे ते राष्ट्रावादीच्या वर्धापन दिनी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
38 टक्के जास्त निधी दिला
काही दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप थेट त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला 38 टक्के जास्त निधी दिला असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. यावर आता मंत्री संजय शिरसाट काही प्रतिक्रिया देतात का हे पाहण महत्वाचं असणार आहे.
काहीजण सतत बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 7 लाख कोटी रुपये अर्थसंकल्प जाहीर करताना 41 टक्के निधी आदिवासी समाजाला दिला. पण खोटी माहिती देऊन आरोप केले जातात. यामुळे कार्यकर्ता चलबिचल होतो. मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. मुख्यमंत्री देखील याबाबत बोलले. मात्र, त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही असंही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते शिरसाट?
अर्थ विभागाकडून मनमानी सुरु आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही? माझे १५०० कोटींची देणी बाकी आहेत. ते वाढत आहेत. माझे पत्र देणे काम आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हे त्यांनी पाहावे. त्यांच्या निर्णय आणि सूचनांची मला कल्पना नाही. सामाजिक खात्याचा निधी वर्ग करता येत नाही, हा कायदा असताना अर्थ विभागातील काही महाभागांकडून हा प्रकार केला आहे. त्यांना असे वाटत की, निधी वळवता येते. कायद्यात पळवापळवी करून निधी घेणे चुकीचे आहे. परंतु, सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करा.
Leave a Reply