मोठी अपडेट! पतीच्या हत्येनंतर सोनम इंदौरला आली, बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये…

राजा रघुवंशी हत्याकांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. मेघालय पोलिसांनी ‘ऑपरेशन हनीमून’ अंतर्गत सर्व आरोपींना पकडलं आहे. मेघालय पोलिसांच्या कोअर टीममध्ये २० सदस्य होते, जे या हत्याकांडाच्या तपासात गुंतले होते.

इंदौर पोलिसांनीही या तपासात सहकार्य केलं. एसआयटी टीमने ७ जून रोजी तीन आरोपींची प्रोफाइल तपासली, तेव्हा सोनम घटनास्थळापासून १० किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशी याची हत्या सोनमच्या समोरच झाली. २१ मे रोजी सर्व आरोपी गुवाहाटीला आले आणि सोनमच्या होम स्टे जवळील हॉटेलमध्ये थांबले.

२३ मे रोजी राजाची हत्या करुन सर्वजण परत गेले. सोनमही २३ मे रोजी गुवाहाटीहून इंदौरला ट्रेनने आली. २५ मे रोजी ती इंदौरला पोहोचली आणि तिच्या प्रियकर राज कुशवाहाला भेटली. बॉयफ्रेंड राजसोबत तिने इंदौरमध्ये एका भाड्याच्या खोलीत, एकाच बेडरुमध्ये एक दिवस राहिली. त्यानंतर एका ड्रायव्हरने तिला वाराणसीला सोडलं. वाराणसीहून सोनम बसने गाजीपुरला गेली. हत्येनंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज यांच्यात सतत संपर्क होता.

शिलाँग पोलिसांना सुमारे ४२ सीसीटीव्ही फुटेज मिळाले. आरोपींनी हत्येसाठी वापरलेलं हत्यार गुवाहाटीतील हॉटेलबाहेरील दुकानातून खरेदी केलं होतं. सर्व आरोपी ट्रेनने गुवाहाटीला पोहोचले होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, सोनम फक्त आपल्या पतीच्या हत्येसाठीच तेथे गेली होती.

लग्नाच्या १० दिवसांनंतर तिने हत्येचा कट रचला. या जोडप्याने एकही फोटो काढला नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून एक पोस्ट टाकली, ज्यामुळे संशय आणखी वाढला. दुपारी २:१५ वाजता हत्या झाली आणि त्यानंतर तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “सात जन्मांची साथिदार.”

पोलिसांना ३ आणि ४ जून रोजीच कळलं होतं की, सोनम या हत्येत सामील आहे. आकाशचा खूनाने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला होता. सोनमने आपला रेनकोट आकाशला दिला होता, जो घटनास्थळापासून ६ किलोमीटर दूर सापडला. हे सर्व तपास भटकवण्यासाठी केलं गेलं होतं.

आरोपी आनंद कुर्मी जेव्हा पकडला गेला, तेव्हा त्याने तेच कपडे घातले होते जे त्याने हत्येच्या वेळी घातले होते. हत्येनंतर सर्व आरोपी ११ किलोमीटर दूर जाऊन भेटले होते. हत्येमागील कारण होतं राजा रघुवंशीला मार्गातून हटवणं आणि सोनमला राजसोबत राहायचं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *